Aparna RMC

Aparna ready mix concrete

‘अपर्णा एंटरप्रायझेस’ची देशात १५० कोटी गुंतवणुकीची योजना

Sep 14, 2023

Aparna RMC mumbai navi plant inaguration

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड या बांधकाम साहित्य उत्पादक कंपनीने ‘अपर्णा आरएमसी’ नाममुद्रेअंतर्गत, राज्य आणि मुंबईतील रेडी-मिक्स काँक्रीटच्या (आरएमसी) वाढत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत विस्ताराची योजना आखली आहे. यासाठी राज्यात १५० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून मुंबईत सात आरएमसी प्रकल्प उभारले जाणार आहेत. मालाड आणि ठाणे येथे कंपनीने यापूर्वीच प्रकल्प उभारले आहेत. याव्यतिरिक्त, ‘अपर्णा आरएमसी’ची नागपूर आणि पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये विस्ताराचीही योजना आहे.

मुंबई शहरात पायाभूत सुविधांच्या गरजा सातत्याने वाढत असताना, त्यांमधील गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, तसेच घरबांधणी क्षेत्रात मागणी व पुरवठ्यातील तफावत भरून काढण्याच्या दृष्टीने ‘अपर्णा आरएमसी’ने राज्यात विस्तार करण्याचे ठरविले आहे. मुंबई व उपनगरात विकासाचे व पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प उदयास येत असताना शहरापासूनच्या २० किलोमीटरच्या त्रिज्येच्या परिघात आणखी काही प्रकल्प उभारण्याची अपर्णाची योजना आहे.

सध्या ‘अपर्णा आरएमसी’ची संपूर्ण भारतात वार्षिक १५ लाख घनमीटर इतक्या काँक्रीट उत्पादनाची क्षमता आहे. ही एकूण क्षमता २०२५ मध्ये ६० टक्क्यांनी वाढवून २४ लाख घनमीटर इतकी करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या या विभागाकडे ३०० ट्रान्झिट मिक्सर, ७० काँक्रीट पम्पिंग सिस्टीम आणि पाच बूम पंप आहेत. उंच इमारतींसाठी काँक्रीटचे पम्पिंग करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत.